बँकेत जायचंय? आधी कॅलेंडर पाहा! पुढच्या आठवड्यात ४ दिवस सुट्टी

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Banks closed for 4 days ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देशातील विविध राज्यांमध्ये सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. २४ ते ३० ऑगस्टदरम्यान बँक शाखा एकूण चार दिवस बंद राहणार आहेत. मात्र, या सुट्ट्या सर्व राज्यांसाठी लागू नसून, संबंधित राज्यांमधील सणांनुसार बँकांना सुट्टी असेल.आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, २५ ऑगस्टला केरळ आणि आंध्र प्रदेशातील बँका मिलाद-उन-नबी किंवा मिलाद-ए-शरीफ आणि ओणमच्या निमित्ताने बंद राहतील. त्यानंतर २६ ऑगस्टला महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, मणिपूर, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ, दिल्ली, बिहार, छत्तीसगड आणि झारखंडमधील बँकांना ईद-ए-मिलाद, बरावफत किंवा मिलाद-उन-नबी आणि थिरुओणमच्या उत्सवानिमित्त सुट्टी असेल.
 
 

bank 
२८ ऑगस्टला गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ आणि हिमाचल प्रदेशातील बँका रक्षाबंधनानिमित्त बंद राहतील. ३० ऑगस्टला रविवार असल्याने देशभरातील बँक शाखांना नियमित साप्ताहिक सुट्टी असेल. २९ ऑगस्ट हा महिन्याचा पाचवा शनिवार असल्याने त्या दिवशी बँका सुरू राहतील.बँक शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल व्यवहारांमध्ये अडचण येणार नाही. ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे २४ तास उपलब्ध राहतील. दरम्यान, ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या पुढील आठवड्यात जन्माष्टमीनिमित्त ४ सप्टेंबरला काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर ६ सप्टेंबरला रविवारची साप्ताहिक सुट्टी राहणार आहे. त्यामुळे बँकिंगचे प्रत्यक्ष शाखेतील कामकाज नियोजित करण्यापूर्वी संबंधित शहरातील सुट्टी तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.