आयफोनचा EMI ठरला जीवघेणा? दिल्लीतील शिक्षिकेने यमुनेत उडी

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Delhi teacher jumps into Yamuna आयफोनच्या हप्त्यांचा आर्थिक ताण वाढल्याने दिल्लीतील एका ३० वर्षीय नृत्य शिक्षिकेने यमुना नदीत उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील कालिंदी कुंज परिसरात रविवारी ही घटना घडली. मात्र, वेळीच पोलिस आणि दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) पथकाने हस्तक्षेप केल्याने तिचा जीव वाचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने नुकताच छंद म्हणून आयफोन हप्त्यांवर खरेदी केला होता. मात्र, तिचे उत्पन्न कमी असल्याने दर महिन्याचा ईएमआय भरणे तिच्यासाठी कठीण ठरू लागले. हप्त्यांचा वाढता आर्थिक ताण आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक दबावामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
 
 

aliya 
 
रविवारी कालिंदी कुंजजवळ ती यमुना नदीत उडी घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि डीडीएमएच्या बचाव पथकाने तातडीने कारवाई करत तिला नदीतून बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, ही घटना महाराष्ट्रातील अलीकडील एका धक्कादायक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे. मोबाईल फोनच्या वादातून महाराष्ट्रात एका कुटुंबावर शोकांतिका ओढवली होती. खड्ड्यात पडून वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर आईनेही आत्महत्या केली होती. त्यामुळे मोबाईल फोन आणि आर्थिक ताणाशी संबंधित घटनांनी चिंता वाढली आहे.