गजानन नगरात इको फ्रेंडली राखी स्पर्धा

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Eco Friendly Rakhi Competition गजानन नगर येथे संस्कार केंद्रांतर्गत सेवा वस्तीतील मुलांसाठी इको फ्रेंडली राखी स्पर्धेचे आयोजन सौ. प्रगती कुलकर्णी व गजानन शाखा ग्रुपतर्फे करण्यात आले. स्पर्धेत सुमारे ४० मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
 
sos
 
   
विजेत्या स्पर्धकांना पियुष कोराने, श्रीकांत देशपांडे व मनीष खर्चे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. अनिल जैन, सुरेश चव्हारे व मनोहर तोरसेकर यांनी मुलांचे कौतुक करून त्यांना बिस्किटे व चॉकलेटचे वाटप केले. उपस्थितांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.
सौजन्य: सुरेश चव्हारे,संपर्क मित्र