दारव्हा येथे भव्य कावडयात्रा सोमवारी

कालीचरण महाराज राहणार उपस्थित

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
kawad yatra कावडयात्रा समिती दारव्हाच्या वतीने दुसरा श्रावण सोमवार म्हणजेच, 24 ऑगस्टला शहरात भव्य कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारा हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार असून यामध्ये सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
 
kawad yatra
 
 
ही कावडयात्रा सोमवार, 24 ऑगस्टला सकाळी 7 वाजता तपोनेश्वर महादेव मंदिरातून सुरू होईल. पुढे बोरी, शेलोडी, चिंतामणी देवस्थान, चौफुली, बायपासरोड, झाशीराणी चौक, आर्णी रोड, छत्रपती शिवाजीमहाराज नगर, अंबिकानगर, बसस्थानक, गोळीबार चौक, जैन मंदिर रोड, छ. शिवाजी महाराज चौक, भाजी मार्केट असे मार्गक्रमण करून मल्लिकार्जुन महादेव मंदिरात समापन होईल.kawad yatra मंदिर परिसरात महादेवाचा जलाभिषेक व महाआरतीने यात्रेची सांगता होईल. यावेळी कालीचरण महाराजांच्या ओघवत्या वाणीतून शिवभक्तांना मार्गदर्शन करतील.