अमेरिकेत गुजराती दुकानदाराची गोळ्या झाडून हत्या

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
टेनेसी,
Gujarati shopkeeper killed in the US मेरिकेतील टेनेसी राज्यातील जॅक्सन येथे एका ५६ वर्षीय गुजराती दुकानदाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता रिजक्रेस्ट रोडवरील दारूच्या दुकानात ही घटना घडली. मृत व्यक्तीची ओळख सुरेश पटेल अशी झाली असून, गोळीबाराच्या वेळी त्यांची १९ वर्षीय मुलगी त्यांच्याजवळच उभी होती. सुदैवाने ती या हल्ल्यात बचावली.पोलिसांच्या माहितीनुसार, मुखवटा घातलेला एक सशस्त्र व्यक्ती दुकानात शिरला आणि त्याने रोख रकमेची मागणी केली. पैसे मिळाल्यानंतर संशयिताने दुकानात अनेक गोळ्या झाडल्या. यामध्ये सुरेश पटेल यांना गोळी लागली आणि त्यांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले.
 
 
masriuf
 
गोळीबारात दुकानातील ७० वर्षीय कर्मचारीही खाली पडल्याने त्यांच्या मनगटाचे हाड मोडले. हल्ल्यानंतर संशयित पांढऱ्या रंगाच्या सेडान कारमधून फरार झाला. त्याने राखाडी हुडी, जीन्स आणि काळ्या रंगाचे वर्क-स्टाईल बूट घातले होते, तसेच चेहरा पेंटबॉल-शैलीच्या मास्कने झाकला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरेश पटेल हे मूळचे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील कडी तालुक्यातील अखज गावचे रहिवासी होते. स्थानिक वृत्तांनुसार, त्यांनी काही दिवसांपूर्वीच हा व्यवसाय ताब्यात घेतला होता. पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू असून, त्याच्याबाबत माहिती असलेल्या नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.