शिक्षणाला नवी दिशा, गुणवत्तेला नवी उंची

शिरपूर केंद्रात शिक्षकांचे विचारमंथन

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
शिरपूर जैन,
new direction for education शिरपूर केंद्राच्या वतीने केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कोंडबा तात्या ढवळे विद्यालय, शिरपूर येथे करण्यात आले होते. या परिषदेत शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन, चर्चा व नियोजन करण्यात आले होते.
 
 

शिक्षणाला नवी दिशा 
 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोंडबा तात्या ढवळे विद्यालया चे प्राचार्य अनंत देशमुख हे होते. परिषदेला केंद्रप्रमुख संजय सुरेकर, संतोष जोशी, भाऊराव गोरले, शंकर तांदळे व सनमती पंचवाटकर ह्यांनी मार्गदर्शन केले. केंद्र परिषदेत ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत स्तर निश्चिती व विश्लेषण, जिल्हास्तरीय उपक्रम, डिजिटल साहित्याचा प्रभावी वापर, राज्याची धोरणात्मक विषयांवरील चर्चा तसेच शालेय समस्यांवर चर्चा, नियोजन व समारोप या विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचे विश्लेषण आणि शाळास्तरावरील विविध समस्या यावर शिक्षकांनी एकत्रितपणे विचार करून प्रभावी उपाययोजना आखणे हा या शिक्षण परिषदेचा मुख्य उद्देश होता.new direction for education एकत्र येऊया ! विचार करूया!! नियोजन करूया !! गुणवत्तापूर्ण शिक्षण घडवूया!!! या प्रेरणादायी संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमुळे शिरपूर केंद्रातील शैक्षणिक कार्याला निश्चितच नवी दिशा मिळणार आहे.ह्या परिषदेला शिरपूर केंद्रातील सर्वच शाळाचे शिक्षक उपस्थित होते