रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृत्यू...नेमका प्रकार काय?

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
बारामती,
Rohit Pawar's daughter death बारामतीतील रुई परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तसेच हे प्रकरण हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता झालेली नाही.प्राथमिक माहितीनुसार, रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर मुलगी घरातून बाहेर पडली. बराच वेळ ती घरी परतली नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडेही दाखल करण्यात आली होती.
 
 
 
oawae
मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळच मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बारामतीच्या रुई येथील साई गणेश नगर परिसरात फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून, घटनास्थळाची पाहणी करत पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.मुलीचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. तिच्या मृत्यूमागे घातपात आहे की अन्य काही कारण, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणामुळे परिसरातही चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार लवकरच बारामतीत दाखल होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासातून या रहस्यमय मृत्यूमागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.