११ डिसेंबरपर्यंत सावधान! शनिच्या वक्री चालीने ‘या’ ३ राशींची परीक्षा

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मफळदाता आणि न्यायदेवता शनिदेव २७ जुलै २०२६ रोजी मीन राशीत वक्री झाले आहेत. त्यांची ही वक्री अवस्था ११ डिसेंबर २०२६ रोजी संपणार असून त्याच राशीत शनि पुन्हा मार्गी होईल. ज्योतिषीय मान्यतेनुसार या काळात काही राशींना मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि कामातील अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
 
 
 
Saturn
 
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ काहीसा कठीण ठरू शकतो. केलेल्या मेहनतीचे अपेक्षित कौतुक न होणे किंवा कामाचे परिणाम उशिरा मिळणे यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. नवीन संपर्कांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. या काळात गुंतवणुकीचे निर्णय घेताना विशेष काळजी घेण्याची गरज असून चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते.
 
 
धनु राशीसाठीही शनिची वक्री चाल आव्हानात्मक मानली जात आहे. आत्मविश्वास कमी होणे, संभ्रम वाढणे आणि निर्णय घेताना अडचणी येण्याची शक्यता आहे. नवीन व्यक्तींवर लगेच विश्वास न ठेवता भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळावे. कार्यक्षेत्रात संयमाने काम करणे आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरणातही तणाव निर्माण होऊ शकतो. मीन राशीच्या व्यक्तींनी तर अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आर्थिक नुकसान, करिअरमधील चढ-उतार आणि व्यवसायातील जोखमी वाढू शकतात. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच महत्त्वाची कामे आधी पूर्ण करण्यावर भर द्यावा. या कालावधीत मोठी जोखीम घेणे आणि नवीन कामाची सुरुवात करणे शक्यतो टाळावे, असा ज्योतिषीय सल्ला दिला जातो.