नागपूर विमानतळावर मदतीसाठी कर्मचारी

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
नागपूर,
nagpur airport नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना मदत करण्यासाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार प्रक्रियेंतर्गत 'जीएमआर' कडून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. पॅसेंजर सर्व्हिस असोसिएट्सच्या मदतीने संपूर्ण टर्मिनल्सवर सुखकर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे.
 
 
nagpur airport
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार प्रक्रियेंतर्गत 'जीएमआर' कडून विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना आता सामान घेतल्यानंतर ट्रॉली शोधण्यासाठी भटकावे लागणार नाही. प्रवाशांच्या सुविधेसाठी जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्टने बॅगेज बेल्टजवळच ट्रॉली उपलब्ध करून दिल्या आहेत. पूर्वी सामान ताब्यात घेतल्यानंतर प्रवाशांना ट्रॉली आणण्यासाठी काही अंतर चालावे लागत होते.
 
 
विशेषतः जास्त सामान असलेले प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना याचा त्रास होत होता. नव्या व्यवस्थेमुळे बॅगेज बेल्टवरून बॅग उचलताच ती थेट ट्रॉलीत ठेवता येणार आहे. या बदलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सामान हाताळणेही सोपे झाले आहे. नागपूर विमानतळावरील प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी तसेच गरजेच्या वेळी 'पॅसेंजर सर्व्हिस असोसिएट्स' उपलब्ध आहेत.