मंगरूळनाथ,
तालुक्यातील चांधई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.chandhai zp school या संदर्भात पालकवर्ग व ग्रामस्थांच वतीने भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र ठाकरे, शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रेम जाधव, उपाध्यक्ष अमोल डिगांबर हागे यांनी शिक्षण विभागाकडे तात्काळ पाठपुरावा केला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून रविंद्र ठाकरे यांनी संबंधित शिक्षण अधिकार्यांशी चर्चा करून शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा व मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला तात्काळ यश मिळाले असून चांधई जिल्हा परिषद शाळेत नवीन शिक्षक रुजू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिक्षक रुजू झाल्यानंतर पालकवर्ग व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
तालुयातील इतर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्याबाबतही संबंधित शिक्षणधिकार्यांना सूचना देण्यात आल्या असून,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत अशीही भूमिका मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दर्जेदार व सातत्यपूर्ण शिक्षण मिळणे हीच प्राथमिकता असून शिक्षकां अभावी एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया रविंद्र ठाकरे यांनी व्यक्त केली.