वर्धा
prof-dr-maheshkar ज्ञानज्योतीची अखंड परंपरा इतिहासाच्या पाऊलखुणेतून प्रवाहित होत आजच्या ज्ञानविश्वाला प्रकाशमान करीत आहे, असे मत प्रा. डॉ. प्रियराज महेशकर यांनी व्यक्त केले.
स्थानिक कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे मेरी रिचमंड ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथालयाचे जनक डॉ. आर. एस. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुनील तोतडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वर्षा पाटील उपस्थित होत्या.
भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचा मागोवा घेताना प्रा. डॉ. प्रियराज महेशकर पुढे म्हणाले की, भारतामधील तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशीला यासारख्या जगविख्यात विद्यापीठांमध्ये ज्ञानाची साधना, चिंतन आणि अध्ययनाची समृद्ध परंपरा विकसित झाल्याने या ज्ञानपरंपरेचा प्रभाव पुढे अरबस्थान, युरोप आणि पाश्चिमात्य देशात पोहोचला असून भारत प्राचीन काळापासूनच आशिया खंडातील ज्ञान, चिंतन आणि प्रज्ञेचे महत्वपूर्ण केंद्र राहिला आहे,
प्रास्ताविक डॉ. वर्षा पाटील, संचालन विद्यार्थिनी अस्मिता पाटील हिने केले तर, आभार प्रज्वल कोरडे याने मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.