सणासुदीतील महाप्रसादावर तुकारात मुंढेंची करडी नजर

आयोजनासाठी परवाना राहणार बंधनकारक

    दिनांक :23-Aug-2026
Total Views |
मुंबई
tukaram-mundhe आगामी सणसमारंभासह उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसादांचं केलं जाणार आयोजन बघता एफडीएने कंबर कसली असून महाप्रसादासाठी अधिकृत परवाना किंवा नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. विनापरवाना महाप्रसाद आयोजित केल्यास आयोजकांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहे. महाप्रसाद करत असताना स्वच्छता, मास्क, हातमोजे आणि आरओचं पाणी देणे बंधनकारक असणार आहे. अन्नाचा दर्जा, स्वच्छता राखण्यासाठी एफडीएने काही अटी पाळण्याच बंधनकारक केल आहे.

tukaram
 
त्यानुसार, महाप्रसादाचा स्वयंपाक बनविण्यासाठी तसेच पिण्यासाठी आरओ पाण्याचा वापर करावा लागणार आहे. महाप्रसाद बनविणाèया आणि वाटणाèया स्वयंसेवकांना डोक्यावर टोपी घालणे बंधनकारक केले आहे. शिळे अन्न भाविकांना वाटप केल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाणार. तसेच महाप्रसादाचे अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या भांड्याचाच वापर करावा लागणार आहे. आयोजकांना सोय व्हावी यासाठी एफडीएने नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ केली असून अवघ्या शंभर रुपयात ऑनलाईन नोंदणी पद्धतीने परवाना प्राप्त होणार आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाèया आयोजकांवर एफडीएकडून कारवाई केली जाऊ शकते. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक महाप्रसादाचा लाभ घेत असल्याने अन्नातून विषबाधा किंवा आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी हे नियम लागू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.