कोलंबो,
Yashasvi started quarrelling भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. एसएससी कोलंबो येथे सुरू असलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, यशस्वीला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर ४५ धावांवर क्लीन बोल्ड झाल्यानंतर तो नाराज दिसला. भारताच्या डावातील १७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फर्नांडोने राऊंड द विकेट गोलंदाजी करत चांगल्या लांबीचा चेंडू टाकला.
वेगाने आत आलेल्या या चेंडूवर यशस्वीने ऑफ-साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची आतील कड घेऊन थेट यष्टींवर आदळला. याआधी यशस्वीने फर्नांडोच्या याच षटकात सलग तीन चौकार लगावले होते. विकेट मिळाल्यानंतर फर्नांडोने आक्रमक पद्धतीने त्याला ‘सेन्ड-ऑफ’ दिल्याचे पाहायला मिळाले. पॅव्हेलियनकडे जात असताना यशस्वी आणि फर्नांडो यांच्यात शाब्दिक वाद झाला. यशस्वी पुन्हा गोलंदाजाच्या दिशेने गेल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. हे पाहून श्रीलंकन कर्णधाराने हस्तक्षेप करत दोघांना वेगळे केले आणि यशस्वीला ड्रेसिंग रूमकडे पाठवले. यशस्वीने ४५ धावांच्या खेळीत ९ चौकार मारले. त्याच्याआधी केएल राहुल ३३ चेंडूंत १८ धावा करून बाद झाला. दरम्यान, संसर्गामुळे कुलदीप यादव या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी ३३ वर्षीय सारांश जैनला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.