कारंजा लाड,
stray dog attack शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवार २३ ऑगस्ट रोजी पुन्हा एका ८ वर्षीय मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कलंदरिया नगर, प्रभाग क्रमांक १५ येथील एक ८ वर्षीय मुलगा कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुलगा घाबरला असून, परिसरातील नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. कारंजा शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून, यापूर्वीही नागरिक, लहान मुले आणि दुचाकीस्वारांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः लहान मुलांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका अधिक असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.stray dog attack मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण तसेच धोकादायक कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी मोहीम राबविण्याची गरज आहे. वारंवार घडणार्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, नगर परिषद प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.