अखंड भारत हे स्वप्न नव्हे सनातन सत्य : डॉ. मानसी कवीमंडन

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
वर्धा,
dr manasi kavimandan देश हा सीमारेषांनी दर्शविला जातो, पण राष्ट्र ही भावना आहे. आपले राष्ट्र स्वातंत्र्य प्राप्तीत विभागले गेले असले तरी त्या विभाजित भागासंबंधीची आत्मियता आपल्या अंत:करणात आजही कायम आहे. भारत ही देवभूमी, तपोभूमी, संस्कृत भाषा, भव्य दिव्य संस्कृती, निसर्ग संबंधित प्रथा, परंपरा, सण, आदींच्या एकसूत्रात बांधलेले राष्ट्र असल्याने अखंड भारत हे स्वप्न नसून ते सनातन सत्य आहे, असे विचार अमरावती येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या प्रसिद्ध कन्सल्टंट फिजिशियन व संवेदना ग्रामीण आरोग्य सेवा प्रकल्पाच्या संचालक डॉ. मानसी कवीमंडन यांनी व्यत केले.
 

dr manasi kavimandan 
 
 
येथील गोल बाजार स्थित अतिप्राचीन लोकमान्य टिळक स्मारक स्मृती परिसरात अखिल आर्यवर्त संघ अंतर्गत आंतरराष्ट्रीय बजरंग दल व दुर्गाशती परिषद द्वारा अखंड भारत दिन स्मृती समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर दै. तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास, बजरंग दल विदर्भ प्रांत प्रमुख संतोष ठाकूर व दुर्गाशती परिषदेच्या प्रांत प्रमुख शितल बघेल उपस्थित होत्या.
याप्रसंगी प्रफुल्ल व्यास म्हणाले की, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे निर्भीडपणे ब्रिटिशांना सांगणार्‍या लोकमान्याचा पुतळा गत कित्येक वर्षांपासून या नगरात घाणीच्या साम्राज्यात आहे. अनेक नागरिक, संस्था आणि वृत्तपत्रातून सातत्याने लिखाण आणि जागृती केल्यानंतरही त्याकडे कोणालाच लक्ष द्यावेसे वाटू नये हे नागरिकांचे दुर्दैव की टिळकांचे, हे कळायला मार्ग नाही. कित्येक कोटी रुपयांचा सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आणि कार्यान्वितही झाला. पण, त्यात लोकमान्य टिळक स्मारक स्मृती परिसराचा समावेश नसावा, याचे आश्चर्य वाटते. आज ज्या तरुणांनी अखंड भारताची मशाल हाती घेतली त्यांनी हे स्मृती स्मारक पूर्णत्वाने नगराचे अभिमानास्पद स्थान करेपर्यंत तेवत ठेवण्याचा संकल्प करणे हीच खरी टिळकांना आदरांजली ठरेल, असेही व्यास म्हणाले.
प्रारंभी अखंड भारत स्मृतिदिनानिमित्त आंतरराष्ट्रीय बजरंग दल द्वारा मशाल हाती घेऊन असंख्य स्त्री-पुरुष कार्यकर्ते नगर परिक्रमेत सहभागी झाले होते.dr manasi kavimandan याप्रसंगी संघटने द्वारा नगरवासीयांच्या सेवेकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खा. रामदास तडस आणि समाजसेवक दुर्गेश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक संतोष ठाकूर तर संचालन श्याम देशपांडे यांनी केले. आभार शितल बघेल यांनी मानले. यशस्वीतेसाठी रणजित गौतम, गौरव पांडे, मोहनसिंग चंदेल, संतोष अण्णावडे, शिवम दुबे, बंटी बनोडे, राजसम्राट बघेल, वीरू पांडे आदींनी सहकार्य केले.