जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात

‘स्टार्टअप कार्निव्हल’ उत्साहात

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
jagadamba college of engineering जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ई-सेलच्या वतीने विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय दृष्टीकोन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि नेतृत्वगुणांना चालना देण्याच्या उद्देशाने ‘स्टार्टअप कार्निव्हल 2026 इंटर-कॉलेज स्टार्टअप पिच एरिना’ हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, अ‍ॅमेझॉनचे एचआर अमोद शर्मा, टीसीएस एचआर प्रतीक अगवान व देवश्री दलाल, संस्था सचिव डॉ. शीतल वातीले, प्राचार्य डॉ. प्रवीण डाखोळे, उपप्राचार्य डॉ. विजय भांबेरे, वंजारी इंजिनीअरिंग प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण, प्रा. दिव्या पोगाकू, समन्वयक प्रा. आशीष महल्ले, प्राध्यापक व विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

jagadamba college of engineering 
 
 
याप्रसंगी उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी यात देहरादून, हिमाचल व गांधीनगर, गुजरात अशा विविध राज्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल विशेष कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अमरावती विद्यापीठाद्वारे स्टार्टअपकरिता तज्ञ मार्गदर्शन व सीडमनीद्वारे आर्थिक पाठबळ कसे उपलब्ध होऊ शकते याबद्दल सांगितले.
सचिव डॉ. शीतल वातीले म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतः रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याची गरज व्यक्त केली. कल्पना, नावीन्य, तंत्रज्ञान आणि योग्य व्यावसायिक नियोजन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजाच्या गरजा ओळखून स्टार्टअप्स उभारावे.
प्राचार्य डॉ. प्रवीण डाखोळे यांनी, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि उद्योजकीय मानसिकता विकसित होते, असे सांगितले. ‘पिच युवर आयडिया, कनेक्ट विथ एक्सपर्टस, बिल्ड द फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित या स्टार्टअप पिच स्पर्धेत 45 विविध इंजिनीअरिंग महाविद्यालयातील 650 विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना सादर केल्या.jagadamba college of engineering या विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडण्याबरोबरच तज्ञ मार्गदर्शन व अभिप्राय संधी या माध्यमातून मिळाली. स्पर्धेतील प्रथम विजेते आयआयटी, गांधीनगरचा कोअर नोवा संघ यामध्ये पल्लवी बिसेन, प्रियंका भारती, सत्यम गुप्ता, सुजल मखवाना याचा समावेश असून त्यांना ‘युरेका 2026’ या ई-सेल, आयआयटी, मुंबईच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता राष्ट्रीय स्तरावरील उद्योजकीय व्यासपीठाकडे जाणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी गौरी दुधे व देवश्री देशमुख यांनी व आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ. प्रवीण डाखोळे यांनी केले.