यूट्यूबला टक्कर देण्यासाठी चीनच्या बिलिबिलीचे जागतिक लाँच

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
मुंबई
bilibili global launch सस्त्या AI मॉडेल्सनंतर आता चीनने व्हिडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रातही जागतिक स्तरावर विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Bilibili ने आपले ग्लोबल व्हर्जन लाँच केले असून, यूट्यूबला पर्याय म्हणून या प्लॅटफॉर्मकडे पाहिले जात आहे. सध्या हे अॅप Android वापरकर्त्यांसाठी Google Play Store वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. लवकरच iOS वापरकर्त्यांसाठीही ते App Store वर उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
 

bilibili global launch china’s youtube rival targets gen-z with easy monetization 
Bilibiliमध्ये यूट्यूबप्रमाणेच वापरकर्त्यांना व्हिडिओ अपलोड करण्याबरोबरच लाइव्ह स्ट्रीमिंगची सुविधाही मिळणार आहे. विशेषतः Gen-Z आणि तरुण वर्गाला लक्षात घेऊन या प्लॅटफॉर्मची रचना करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत X पोस्टद्वारे Bilibiliचे जागतिक स्तरावरील लाँच जाहीर केले. ग्लोबल व्हर्जनचा उद्देश आंतरराष्ट्रीय कंटेंटचे वितरण वाढवणे, स्थानिक गरजेनुसार प्लॅटफॉर्मचे लोकलायझेशन करणे आणि साइन-अप प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. लवकरच लोकलाइज्ड कंटेंट ऑप्टिमायझेशन हे फीचरही जोडले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय व्हर्जनच्या अॅपमध्ये वरच्या बाजूला ग्लोबलचे चिन्ह दिसणार आहे.
यूट्यूबप्रमाणेच Bilibiliवर क्रिएटर्सना आपल्या कंटेंटमधून कमाई करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे क्रिएटरने पहिला कंटेंट अपलोड केल्यानंतरच कमाईची संधी उपलब्ध होऊ शकते. यूट्यूबप्रमाणे कमाई सुरू करण्यासाठी स्वतंत्र मॉनिटायझेशन पात्रता निकष पूर्ण करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कंटेंट मोठ्या प्रमाणावर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे हा Bilibiliच्या ग्लोबल विस्तारामागील महत्त्वाचा उद्देश आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने Mr Beast यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिएटर्सनाही आपल्या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित केले आहे.
ग्लोबल व्हर्जनमध्ये साइन-अप प्रक्रिया bilibili global launch अत्यंत सोपी करण्यात आली आहे. अधिकाधिक क्रिएटर्सनी प्लॅटफॉर्मचा वापर करावा यासाठी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन ठेवण्यात आलेले नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या क्रिएटर्सना Bilibiliशी जोडणे कंपनीसाठी अधिक सोपे होण्याची शक्यता आहे.
मात्र, जागतिक विस्ताराचा मार्ग Bilibiliसाठी आव्हानविरहित असणार नाही. कंपनीने लॉस एंजल्स, लंडन, मेक्सिको सिटी, साओ पाओलो, इस्तंबूल आणि टोकियो येथे नोकरीच्या संधींसाठी जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्याची कंपनीची तयारी दिसून येते. त्याचवेळी, कंटेंट प्रकाशनाचे नियम आणि डेटा स्टोरेजसंबंधीच्या नियामक अडचणींचा सामना Bilibiliला अनेक देशांमध्ये करावा लागू शकतो.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आधीपासून मजबूत स्थान निर्माण केलेल्या YouTubeशी थेट स्पर्धा करणे हेही Bilibiliसमोरील मोठे आव्हान असेल. क्रिएटर्सना सुरुवातीपासूनच कमाईची संधी, सोपी साइन-अप प्रक्रिया आणि तरुण वर्गावर केंद्रित केलेली वैशिष्ट्ये यांच्या जोरावर Bilibili जागतिक व्हिडिओ स्ट्रीमिंग बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.