वायसीसीईमध्ये प्राध्यापकांसाठी आयईईई प्रशिक्षण

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
नागपूर
Central Library यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रीय ग्रंथालयातर्फे प्राध्यापकांसाठी आयईईई प्रशिक्षण कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. आयईईईच्या ई-संसाधनांचा संशोधन, अध्यापन, साहित्य समीक्षा व प्रकल्प मार्गदर्शनासाठी प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मुंबईचे प्रशिक्षण व्यवस्थापक गौरव दाते यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
 
 
student
 
 
कार्यक्रमात सुमारे १३५ प्राध्यापकांनी सहभाग घेतला. डॉ. राजेंद्र पहाडे यांनी स्वागत करून कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. केंद्रीय ग्रंथालयाच्या या उपक्रमामुळे डिजिटल संसाधनांचा प्रभावी वापर आणि संशोधनाला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
सौजन्य:राजेन्द्र पहाडे,संपर्क मित्र