बुलढाणा,
cash stolen अमडापुर येथील चिखली रोडवरील महादेव मंदिर परिसरात रविवारी मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली. कैलास खांडेभराड यांच्या घराच्या मागील बाजूने चोरट्यांनी प्रवेश करून घराच्या दरवाजाचे मागील बाजूचे कुलूप तोडले. त्यानंतर कपाटाचे कुलूप फोडून अंदाजे ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली. परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
दि. २३ च्या रात्री अंदाजे २ ते पहाटे ४.३० वाजेदरम्यान घराच्या भिंतीवरून चढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर कपाटाचेही कुलूप फोडण्यात आले. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.cash stolen घटनेची माहिती अमडापुर पोलिसांना देण्यात आली. पोलीस कर्मचारी चंद्रशेखर मुरडकर व बिट जमादार सुमरसिंह ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळ पोलिस स्टेशनपासून जवळ असल्याने या धाडसी चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.