नागपूर,
Group Song Competition विद्याभारती विदर्भाचे श्रद्धेय विनायकराव फाटक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २२ ऑगस्ट रोजी आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. यात नवयुग प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी दोन देशभक्तीपर गीतांचे सुरेल सादरीकरण केले. तबला, हार्मोनियम व झांज ही वाद्येही विद्यार्थ्यांनीच वाजविली.
स्पर्धेत नवयुग प्राथमिक शाळेला प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिकमिळाले. विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व एक हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. मुख्याध्यापक अजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत शिक्षिका आकांक्षा शंभरकर व सहाय्यक शिक्षिका सविता उईके यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.
सौजन्य :जयश्री बोबडे,संपर्क मित्र