शेत-पांदण रस्ता कामे त्वरित सुरू करा

आ. किसन वानखेडे यांचे निर्देश

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
mla kisan wankhede विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजना अंतर्गत मंजूर कामांना गती देण्याचे निर्देश आमदार किसन वानखेडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे शेत-पांदण रस्त्यांच्या मंजूर कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी मंजूर कामांची संख्या, सद्यस्थिती, प्रशासकीय प्रक्रिया तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा आढावा घेण्यात आला.
 

mla kisan wankhede 
 
मंजुरी कागदावर नको, काम प्रत्यक्ष शेतात दिसले पाहिजे, असे स्पष्ट करत मंजूर कामे प्रशासकीय प्रक्रियेत प्रलंबित न ठेवता येत्या दोन आठवड्यांत प्रत्यक्ष सुरू करण्याचे निर्देश आमदार वानखेडे यांनी दिले. शेत-पांदण रस्ते हे शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजांशी निगडित असून शेतमालाची वाहतूक, ट्रॅक्टर व कृषी वाहने शेतापर्यंत नेण्यासाठी त्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कामांच्या अंमलबजावणी दरम्यान विभागांमध्ये समन्वयाचा अभाव राहू नये, आवश्यक परवानग्या व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्यात आणि कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.
 
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, माजी आमदार तथा सहअध्यक्ष प्रकाश देवसरकर, तहसीलदार राजेश सुरडकर, महागाव तहसीलदार अभय मस्के, सदस्य अजय माहेश्वरी, भोजुसिंग चव्हाण, विलास कवाने, सुनील सदावर्ते यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मतदारसंघातील शेतकèयांच्या मूलभूत गरजा आणि विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य आहे.mla kisan wankhede मंजूर शेत-पांदण रस्त्यांची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असेही आ. किसन वानखेडे यांनी सांगितले.