पतीसह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजले

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
जालंधर
toilet cleaner poisoning नवऱ्याने आणि सासूने मिळून महिलेला टॉयलेट क्लीनर पाजल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील करतारपूर कस्ब्यात समोर आला आहे. या घटनेत गंभीररीत्या आजारी पडलेल्या नेहा या महिलेचा फोर्टिस रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिच्या पतीविरोधात आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
 

jalandhar crime: woman dies after alleged toilet cleaner poisoning, husband and mother-in-law booked 
मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्यासह सासूने नेहाला जीवे मारण्याच्या उद्देशाने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप आहे. विषारी पदार्थ पाजल्यानंतर नेहाची प्रकृती गंभीर झाली. तिला तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत नेहाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
नेहाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा पती आणि सासू सहा वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन फरार झाल्याचेही समोर आले आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला असून, त्यांच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.दरम्यान, नेहाच्या मृत्यूनंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबीयांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नेहाने न्यायाधीशांसमोर लिखित स्वरूपात आपला दावा मांडल्याची माहितीही समोर आली आहे.या प्रकरणाच्या तपासादरम्यान नेहाच्या पतीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत कथित संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, या सर्व बाबींची सत्यता तपासल्यानंतरच स्पष्ट होणार असून, पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.