आरोग्य नवकल्पनांसाठी ‘मेडिथॉन’ची पिचिंग फेरी

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Kekatpure Medical Foundation आरोग्यसेवेतील प्रत्यक्ष समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील‘मेडहा मेडिथॉन २०२६ ची दुसऱ्या टप्प्यातील पिचिंग फेरी २२ ऑगस्ट रोजी व्हीएनआयटी येथे झाली. लीलाताई कुलकर्णी मेमोरियल हॉस्पिटल व केकतपुरे मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
 

aadi 
 
 
 
या स्पर्धेसाठी देशभरातील ७० हून अधिक शहरांमधून ७०९ हून अधिक संघांनी नोंदणी केली. त्यापैकी ४१ संघांची दुसऱ्या टप्प्यासाठी निवड झाली. १४० हून अधिक स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या. तज्ज्ञ परीक्षकांनी वैद्यकीय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रुग्णालय व्यवस्थापन आदी क्षेत्रांतील प्रकल्पांचे परीक्षण केले. या फेरीनंतर सर्वोत्तम १० संघांची तीन महिन्यांच्या नवकल्पना मार्गदर्शन कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सौजन्य उर्मिला सराफ,संपर्क मित्र