उत्तर प्रदेश
kurukshetra murder case पत्नीने चाकूने हल्ला केल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कुरुक्षेत्रातील पेहोवा रोड परिसरात घडली. राज पॅलेसजवळील घरात हा प्रकार घडला. मृत व्यक्तीचे नाव राजेश असून तो उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील धामपूर गावचा रहिवासी होता. हल्ल्यानंतर त्याची पत्नी विमला देवी हिने घराच्या छतावरून उडी मारल्याने तीही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
राजेश मागील सुमारे एक वर्षापासून पत्नी विमला देवीसोबत कुरुक्षेत्रात राहत होता. पेहोवा रोडवरील एका कंपनीसाठी तो पाणीपुरवठ्याचे काम करत होता. शनिवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास राजेश आणि विमला यांच्यात भांडण सुरू असल्याचे घरमालक रिंकू यांच्या निदर्शनास आले. आवाज ऐकून रिंकू वर गेले असता राजेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या होत्या.
रिंकू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी विमला राजेशच्या शरीरातून बाहेर आलेली आतडी एका पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. रिंकू यांची नजर पडताच विमलाने घराच्या छतावरून उडी मारल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची झडती घेतल्यानंतर वेगवेगळ्या आकाराचे तीन चाकू जप्त करण्यात आले. याशिवाय घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावेही गोळा करण्यात आले आहेत.शवविच्छेदन अहवालातून राजेशच्या शरीरावरील जखमांची तीव्रता समोर आली आहे. त्याच्या पोटावर सुमारे ३५ सेंटीमीटर लांबीची जखम आढळली असून, अंतर्गत अवयवांनाही गंभीर दुखापत झाली होती. त्याची आतडी शरीरातून बाहेर आलेली असल्याचे शवविच्छेदनात आढळले. तसेच त्याच्या यकृताचा मोठा भाग आणि उजवे मूत्रपिंड गायब असल्याचेही तपासणीत आढळल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी kurukshetra murder case विमला देवीला ताब्यात घेतले आहे. छतावरून उडी मारल्यामुळे झालेल्या दुखापतींवर तिच्यावर उपचार सुरू आहेत. राजेशच्या हत्येमागील नेमके कारण काय होते, तसेच घटनेच्या वेळी नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती, याचा पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले तीन चाकू आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारेही तपास पुढे नेण्यात येत आहे.