नागपूर,
Mauli Seva Mitra Mandal माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूर व गोंदिया पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणूटोला आऊट पोस्ट येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जवळील कडीकसा निवासी आश्रमशाळेतील मुलींना बोलावून त्यांच्या हस्ते पोलीस बांधवांना रक्षा सूत्र बांधण्यात आले.
याप्रसंगी मुली व पोलीस बांधवांना नॅपकिन देऊन तोंड गोड करण्यात आले. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थिनींसाठी हिरवे मॅटिंग सप्रेम भेट देण्यात आले. माऊली सेवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जात असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सौजन्य:सुहास खरे,संपर्क मित्र