marbat-tradition मारबत महोत्सवाला यंदा जागतिक दर्जाचा करण्याचा चंग महानगरपालिकेने बांधला आहे. यासाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे आणि या मोहिमेची धुरा सांभाळत आहेत स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे.
महापौर नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात यंदाचा मारबत महोत्सव एकदम हटके असणार आहे :
- सात दिवसांचा 'सावजी आणि बुनकर महोत्सव'- चौकाचौकांत इतिहास : शहरातील १०० चौकांत क्यूआर कोड आणि मोबाईलवर मारबतीची गोष्ट ऐका-पाहा!
- शहरभर देशभक्ती : मोठ्या एलईडी स्क्रीनवर देशभक्तिपर गीतांचे प्रसारण- पाहुण्यांचा सन्मान : बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी हॉटेल्सना विशेष ग्रेडिंग आणि प्रमाणपत्र