पोलिस आयुक्तांचा ड्रग्ज तस्करांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

- ६ ड्रग्जतस्करावर कारवाई : ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
drug smugglers गेल्या काही महिन्यांपासून शहरात ड्रग्ज तस्करांवर ‘वॉच’ ठेवल्यानंतर पोलिसांनी अचानक ‘सर्जिकल स्ट्राईक’ केली. एकाच वेळी ड्रग्ज तस्करांचे जाळे समूळ नष्ट करीत ११ लाखांच्या मुद्देमालासह ६ तस्करांनाही अटक केली. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष अभियान राबवून ‘ड्रग्ज फ्री सीटी’ साठी सकारात्मक प्रयत्न सुरु केले आहेत. ड्रग्ज तस्करांना सडे कि पडो करुन सोडा, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे शहरात कारवाईचा धडाका सुरु आहे.
 

drug smugglers 
 
 
 
मुंबई आणि गोवा येथून थेट नागपुरात ड्रग्ज तस्करी होत होती. गेल्या दोन वर्षांपासून नागपूर हे ड्रग्ज तस्करीचे केंद्र बनले होते. तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांनी ड्रग्ज तस्करांकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केल्यामुळे शहरात बिनधास्त एमडी विक्री वाढली होती. पानठेल्यासह बार, पब आणि हुक्का पार्लरमध्ये सहज ड्रग्ज उपलब्ध होत होता. ही बाब हेरुन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्वच ठाणेदार आणि एनडीपीएस पथकाचे कान टोचले. तसेच अमली पदार्थ विरोधात विशेष अभियान राबविले. त्यानुसार गेल्या चोवीस तासांत शहरात चार कारवाईत ११ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
मंगळवारी लोहा मार्केट परिसरात दुचाकीवर शेख इजाज शेख मेहमूद (३५), शांतिनगर आणि जीवन कांताराम बारापात्रे (३७), रा. झेंडा चौक, प्रेमनगर हे दोघे संशयास्पदरीत्या दिसून आले. आरोपींच्या ताब्यातून ५२ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. तसेच दुचाकीसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दर्शन चरडे (३०), पिवळी नदी आणि कुणाल गभणे (२०), रा. झेंडा चौक, यांनाही अटक केली.
३ आरोपी अटकेत; २३ ग्रॅम अमली पदार्थ जप्त
पाचपावली आणि गुन्हे शाखेने केलेल्या तीन कारवायांत एकूण २३.१९ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले. यात तीन आरोपींना अटक केली. तसेच तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी अमली पदार्थांसह दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाचपावली पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून अलफाक मोहम्मद मुकीम मलिक (२४, रा. हमीदनगर) आणि भूषण सचिन खापरे (१९, रा. स्वामीनगर) यांना अटक केली. त्यांचे साथिदार कैफ मलिक आणि आकाश पराते हे दोघे फरार झाले.drug smugglers गुन्हे शाखेने नंदनवनमधून नूर मोहम्मद ऊर्फ मोबिन फिरोज खान (२३, रा. शिवणकर झोपडपट्टी, नंदनवन) याला अटक केली. त्याची साथिदार रुखसार ही फरार झाली.
संतू-इमरामची ‘सेटींग’
संतू ऊर्फ पावडर आणि इमराम या दोघांचेही नाव सध्या चर्चेत आहेत. काही लहान ड्रग्ज तस्कर आणि सट्टापट्टी संचालकांसह काही जुगार अड्ड्यावर दोघेही जाऊन कारवाईची धमकी देऊन वसुली करीत असल्याची चर्चा आहे. या दोघांनाही ‘थ्री स्टार’ची सुरक्षा असल्याचे बोलले जाते. छाप्यांपासून संरक्षण देण्यासाठी या दोघांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे.