पुलगाव मध्ये कावड यात्रेपूर्वी मोठा अपघात

डोक्यावर कावड पडल्याने 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
पुलगाव,
pulgaon kawad yatra accident पुलगावच्या नदी फैल परिसरातून आज शिव शंकर कावड यात्रा निघणार होती. यात्रेपूर्वी कावड एका ठिकाणी ठेवण्यात आली होती. त्याचवेळी एक हृदयद्रावक अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, अधिराज रवी पाटील (वय 6 वर्ष), रा. नदी फैल, पुलगाव, हा कावड जवळ खेळत होता. त्याचवेळी कावडच्या पाईपला धक्का लागला. कावड जड असल्याने ती अचानक अधिराजच्या डोक्यावर पडली.
 

pulgaon kawad yatra accident
pulgaon kawad yatra accident 
 
या अपघातात अधिराज गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय, पुलगाव येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, अधिराज हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता, त्याला 3 वर्षाची बहीण आहे. तो इयत्ता पहिलीचा विद्यार्थी होता.pulgaon kawad yatra accident या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची बातमी पसरताच पुलगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत.