बालजगतमध्ये राखी मेकिंग स्पर्धा

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Rakhi-making competition दीनदयाल शोध संस्थान, बालजगत, लक्ष्मीनगर येथे बुधवार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मुलांसाठी राखी मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी ५ ते ९ वर्षे आणि १० ते १६ वर्षे असे दोन गट करण्यात आले आहेत.
 
 
rakhi
 
 
राखी बनविण्यासाठी आवश्यक साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी १,००१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५०१ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३०१ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.इच्छुकानीं बालजगतच्या कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. कार्यालयीन वेळ सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ अशी आहे .वेळेवर देखील प्रवेश दिल्या जाईल
सौजन्य:सायली जतकर ,संपर्क मित्र