राजुरा
shooting outside-rajura-court
शहरातील न्यायालयासमोर सोमवार, 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास दोन आरोपींनी एका युवकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यात त्या युवकाचा मृत्यू झाला. ‘पापा’ उर्फ विनोद जाधव (35, रा. सोमनाथपूर वॉर्ड, राजुरा) असे मृतक युवकाचे नाव आहे. भरदिवसा आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण असलेल्या न्यायालयाच्या विरुद्ध बाजुस असलेल्या प्रदीप बिअर बारच्या बाजूला नेहमी प्रमाणे विनोद जाधव आपल्या मित्रांसोबत बसला होता. इंदिरा नगर येथील आरोपी करण मेकलवार (वय 22) व दीपक बाविसकर (वय 24) हे मृतकावर पाळीत ठेवून होते. त्यांनी ही संधी साधत विनोदच्या डोक्यात व छातीवर तीन गोळ्या झाडल्या. यात विनोद रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. पोलिसांनी घटनास्थळाहून त्यास रुग्णालयात प्रथमचारााकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे नेले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले.
घटनेची माहीती पोलिसांना मिळताच राजुरा पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी घटनास्थळ गाठून जमावाला नियंत्रणात आणले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी भेट देऊन माहीती जाणून घेतली. घटनेनंतर आरोपीने स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन शरनागती पत्करली. पोलिसांनी आरोपीकडून खुणात वापरलेले शस्त्र ताब्यात घेतले आहे.