स्वतःच रचले लुटमार केल्याचे नाट्य

पोलिसांनी उघडकीस आणला बनाव

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
robbery drama themselves पिरॅमिड सीटी परिसरातून जात असताना कारचालकाला लिफ्ट दिल्यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटल्याची तक्रार हुडकेश्वर पोलिस ठाण्यात एका युवकाने केली. मात्र, बेलतरोडी पोलिस आणि हुडकेश्वर पोलिसांनी तपासाअंती त्या युवकाच्या नाट्याचे बिंग फोडले. मित्राचे उधारीचे दोन लाख रुपये द्यायचे नसल्यामुळे लुटमार झाल्याचा बनाव केल्याचे उघडकीस आले.
 

robbery drama themselves 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल संतोष धर्नेजा (२२, रा. त्रिमूर्तीनगर) हा हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आला. त्याने २२ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली. काही अंतरावर गेल्यानंतर त्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून कारमधील दोन लाखांच्या रकमेसह पळ काढला. ती कार विमानतळ परिसरात बेवारस स्थितीत मिळाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बेलतरोडीचे ठाणेदार रितेश अहेर आणि हुडकेश्वरचे ठाणेदार अनामिका मिर्झापुरे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान अमोल याच्या कथनातील विसंगती निदर्शनास आल्या. तक्रारदाराने घटनेपूर्वीच्या हालचालींबाबत वेगवेगळी व परस्परविरोधी माहिती दिल्याने त्याच्यावर संशय निर्माण झाला.robbery drama themselves यादरम्यान ती कार बेलतरोडीचे सहायक निरीक्षक रविकांत भदाणे आणि पोलिस उपनिरीक्षक नारायण घोडके यांनी ताब्यात घेतली. ठाणेदार रितेश अहेर यांनी तक्रारदार अमोल याची उलटचौकशी केली. त्यात त्यांचा संशय बळावला. त्यांनी लुटमार प्रकरण बनावट वाटले.
अन् अमोलचे बिंग फुटले
ठाणेदार अहेर यांनी तक्रारदाराचा मोबाईल, त्याचे लोकेशन, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुरावे बाबींची सखोल पडताळणी केली. तसेच सखोल चौकशी केली असता लुटमारीची घटना बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अमोलने शेवटी कबुली दिली. त्याने मित्राकडून कॅफे टाकण्यासाठी घेतलेले दोन लाख रुपये परत करता येणार नसल्याने लुटमार केल्याचा बनाव केल्याचे सांगितले.