राष्ट्र हितैषी रचनात्मक कार्यात सर्व समाजानेच सक्रीय सहभाग घ्यावा : नलिनी वरणगांवकर

    दिनांक :24-Aug-2026
Total Views |
बुलढाणा,
nalini varangaonkar संस्कृत भाषा सर्व भारतीय भाषांची जननी आहे. संस्कृत भाषा ही संस्कारक्षम असून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. संस्कृत भाषेचा दैनदिन जीवनात उपयोग केल्यास ती मानसिक, शारिरीक आरोग्य वर्धक देखील आहे. प्राचीन काळात संस्कृत ही जनसंवाद भाषा होती. वर्तमान काळात संस्कृत भारती हे संघटन निरपेक्ष भावनेने कार्यरत आहे या समाज व राष्ट्र हितैषी रचनात्मक कार्यात सर्व विद्यार्थीवर्ग, पालकवर्ग, शैक्षणिक संस्था आणि संपूर्ण समाजानेच सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन सुप्रसिद्ध किर्तनकार, प्रवचकार सरस्वती संगीत विद्यालयाच्या प्रमुख नलिनी वरणगांवकर यांनी केले. संस्कृत भारती बुलढाणा आयोजित संस्कृत दिन समारोह आणि गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होत्या.
 

nalini varangaonkar 
 
 
उपरोक्त प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. विजय जोशी (बुलढाणा विभाग संयोजक), नगरमंत्री हर्षा दामले प्रामुख्याने उपस्थित होते. दि.२३ ऑगस्ट, रोजी . शहरातील सुर्यवंशी सायन्स लास सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती संगीत विद्यालयाच्या मातृशक्तींने सामुहिक वंदे मातरम् ने केला. आणि मान्यवरांचे शुभहस्ते दिपप्रज्वलन, भारतमाता, सरस्वती देवी पुजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.शहरातील संस्कृत भारतीच्या वतीने १० शैक्षणिक संस्थातील शिष्यवृत्ती परिक्षा यामध्ये विशेष गुण प्राप्त ३५ विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गुण-गौरव करण्यात आला. यामध्ये मृण्मयी असोलकर (क्रिडाक्षेत्र), सलोनी पिंगळे, प्रिती उचाई, कुणाल मेडकर, श्रद्धा वानखेडे, संयुजा हिंगे, अभिनव पंधाडे, रिया चव्हाण, अनमोल जेठे, श्रेया निंबोळकर, आदिती खडके, अर्णव काळवाघे, पार्थ चतुर, वैष्णवी उबरहंडे, अभिराम पांढरे, समृद्धी पाटील, श्रेयस कड, जान्हवी राजपुत, प्रथमेश बिबेकर, जीत जाधव, अनुष्का घोडेकर, शलाका पवार, आयुष पाटणकर, सर्वज्ञ लाटे, श्रेया सावळे, प्रगती गिरी, स्वराज देशमाने, तन्वी गायकवाड, रुपाली खोडके, वैशाली खोडके यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
 
समारंभाचे प्रास्ताविक परिचय प्रा. विजय जोशी, ध्येयमंत्र, संस्कृत भारती सांघिक गीत श्रीमती. हर्षा दामले, गौरव समारंभाचे संचलन डॉ. शारदा वाघ, सुलभा जोशी, आभार नरेंद्र उके यांनी केले.nalini varangaonkar यशस्वीतेसाठी पदाधिकारी उमा समदूरकर, भुसारी, स्वप्निल जोशी, प्राची जोशी, जयश्री जाधव यांनी परिश्रम घेतलेत. समारंभ प्रसंगी प्रबोधन विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. रविंद्र गणेशे, निमंत्रित विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षण संस्थांचे प्रमुख, नागरीक बंधु भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. शांती मंत्र पठनाने समारोप झाला.