सिंदी (रेल्वे),
haladgao road वर्धा-नागपूर जिल्ह्याला जोडणारा हळदगाव मार्ग या पावसाळ्यात मरणाला सस्ता झाला आहे. केंद्र सरकार प्रायोजित एम. एम. एल. पी. ने जनतेच्या सुविधेसाठी १२५ फूट रूंद रस्ता आज शेतकर्यांसाठी निरुपयोगी नव्हे तर यातनामय झाला आहे. तीन वर्षांपूर्वी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी झाली होती.
तेव्हा या प्रकल्पाच्या हद्दीला लागूनच हळदगावच्या नागरिकांसाठी आणि येथील शेतकर्यांसाठी लाजूरकर यांच्या शेतातून पका रस्ता करून मिळेल, असे जाहीर झाले होते. परंतु, आजपर्यंत तेथे १२५ फुटाचा रस्ता मिळाला नाही. उलट फत १५ फूट रुंद कच्चा मार्ग देण्यात आला. आजघडीला त्या अरूंद मार्गावर चिखलच चिखल असून दुचाकीस्वारांसह बैलबंडी हाकणार्यांना कसरत करावी लागत आहे.haladgao road या लॉजिस्टिक पार्क प्रकल्पाने सिंदीकरांच्या स्वप्नांचा चुराडा झाला, पण शेतकर्यांना शिवारात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बारमाही मार्ग देण्याचे सौजन्य दाखवले नाही! पोळ्याच्या उत्सवाआधी प्रशासनाने किंवा लॉजिस्टिक पार्कच्या अधिकार्यांनी सदर मार्ग दळणवळणासाठी तयार करुन द्यावा, अशी मागणी शिवार परिसरातील ४५ शेतकर्यांनी आहे.