आकोट
two-students-drown- मित्रांसोबत सातपुड्याच्या पायथ्याच्या पर्यटनासाठी गेलेल्या आकोट शहरातील दोन विद्यार्थ्यांचा खटकाली येथील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे अकोट शहरावर शोककळा पसरली असून, मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.चंद्रशेखर दाभाडे वय १६, व कृष्णा चंद्रशेखर झामरे वय १६ रा. दोघेही रा.आकोट येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अकोट शहरातील काही विद्यार्थी मित्रांसोबत सातपुड्याच्या पायथ्याशी पर्यटनासाठी गेले होते. यावेळी खटकाली परिसरातील डोहात हे विद्यार्थी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक तसेच बचाव पथकाच्या मदतीने विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. दोन्ही विद्यार्थी हे आकोट येथील आस्की शाळेत शिकत असल्याची माहिती आहे.