‘त्या‘ वृद्ध दाम्पत्यासाठी अभिषेक ठरला देवदूत

स्वत:चा जीव धोक्यात घालून केली मदत

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
angel for that elderly couple गॅस गळती झाली आणि प्रत्येक जण आपापल्या कुटुंबीयांसोबत मिळेल त्या रस्त्याने धावायला लागला. स्वत:सह कुटुंबीयांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करायला लागला. मात्र, या स्थितीतही एका युवकाने स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता शेजारी राहणारे वृद्ध दाम्पत्याला वाचविण्यासाठी धडपड सुरु केली. एकाकी राहणाऱ्या वृद्ध पती-पत्नीला दोघांनाही घरातून बाहेर काढले आणि आपल्या कारने सुरक्षित ठिकाणी नेले. त्या वृद्ध दाम्पत्यासाठी देवदूत ठरलेल्या त्या युवकाचे नाव आहे अभिषेक तिवारी.

devdut 
 
गोधनीतील फागुजीनगरातील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधील (संप व पंपगृह) राखीव असलेल्या क्लोरीन सिलेंडरमधून मध्यरात्रीनंतर अचानक क्लोरीन गॅसची गळती झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्लांटला लागूनच असलेल्या वसाहतीमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मध्यरात्रीला संपूर्ण फागुजीनगर जागी झाले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी धावपळ करायला लागला. मुला-बाळांना घेऊन दिसेल त्या रस्त्याने वस्तीच्या बाहेर पडायला लागला. यादरम्यान, प्लांटच्या अगदी समोर राहणारे अभिषेक तिवारी यांनीही आपल्या कुटुंबियांना बाहेर काढले आणि काही अंतरावर उभे केले. मात्र, त्यांना लगेच लक्षात आले की आपल्या शेजारी राहणारे वृद्ध दाम्पत्य श्याम इनामदार (75) आणि त्यांची पत्नी आशालता (74) यांची आठवण झाली. अभिषेक यांनी पत्नी निधी व अन्य कुटुंबीयांची समजूत घालून श्याम काकांना घराबाहेर काढण्यासाठी जात असल्याचे सांगितले. अभिषेक यांनी लगेच श्याम काकांच्या घरात धाव घेतली. लगेच वृद्ध काकूंना हातावर उचलून घेतले तर श्यामकाकांचा हातात हात धरला. दोघांच्याही नाकातोंडात तोपर्यंत बराच क्लोरीन वायू गेला होता. हिंमत न हारता दोघांनाही अभिषेकने घराच्या बाहेर काढले. कुटुंबीयांना प्राधान्य न देता वृद्ध दाम्पत्यांना कारने भवानी मंदिरात सुरक्षित स्थळी हलवले. त्यानंतर स्वतःच्या कुटुंबीयांना कारमधून मंदिरात सोडले.

पत्नीचे प्रेम आणि कुटुंबीयांची धाकधूक
आई प्रेमलता आणि वहिणी पूनम यांनी पुन्हा घराच्या दिशेने जाण्यासाठी विरोध केला. पत्नी निधीला वृद्ध दाम्पत्य अडकल्याची जाणिव करुन दिली. पत्नीने मात्र आई आणि वहिणींची समजूत घालून मला वृद्ध दाम्पत्याला आणण्यासाठी परत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. ‘जोपर्यंत तुम्ही परत येणार नाही, तोपर्यंत फोन सुरु ठेवा’ अशी अट घातली. अभिषेकने लगेच ते मान्य करीत वृद्ध दाम्पत्याला घराच्या बाहेर काढले. याप्रसंगात पत्नीचे प्रेम आणि आई-वहिणींची माया दिसून आल्याचे अभिषेकने सांगितले.