बुलडाणा
buldhana ग्रामीण भागातील रस्त्यांना जोडून दळणवळणाची सेवा सुविधा नागरिंकापर्यंत पोहचविण्याच्या दृष्ट्रिकोनातून ग्रामीण मार्ग रस्ते विकास योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्हयातील नवीन ३३ रस्त्यांना दर्जाउन्नोत करण्यास राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मान्यता दिली असुन या संदर्भात शासननिर्णयही निर्गमित झाले आहे. बुलडाणा जिल्हयातील रस्ते विकासाला मान्यता दिल्याबद्दल दि. २५ ऑगस्ट रोजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेवून समाधान व्यक्त केले. व बुलडाणा जिल्हयातील ब वर्ग तिर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा केली.

चांगले रस्ते या विकासाच्या धमन्या म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातून जनतेच्या विकासाठी मुलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम रस्ते विकासाच्या माध्यमातून केले जाते. बुलडाणा जिल्हयातील लोणार तालुयातील ग्रामीण महामार्ग १३३ अंतर्गत आरडव ते मुख्यरस्ता ते अढाव मुख्य रस्ता , हत्ता ते पिंप्री खंडारे रस्ता, सिंदखेड राजा तालुयातील मौजे चांगेफळ ते बोराखेडी गंडे रस्ता, चिखली तालुयातील खंडाळा मकरध्वज ते खैरव फाटा रस्ता, खंडाळा मकरध्वज ते गोद्री एमआयडीसीला जोडणारा रस्ता, बुलडाणा तालुयातील घाटनांद्रा ते उबरखेड रस्ता, अंभोडा ते तांदुळवाडी रस्ता, चिखला ते झरी रस्ता, धाड ते मोहोज रस्ता (जुनी पांदी रस्ता), अंत्री तेली ते केळवद शिवार रस्ता, साखळी खुर्द ते तांदुळवाडी जोडणारा रस्ता, अशा एकूण ३६.५० कि.मीच्या दर्जान्नत करावयाच्या ग्रामीण मार्ग नवनिर्मितीला मान्यता देण्यात आली आहे.
या संदर्भातील शासन निर्णय ३ ऑगस्ट रोजी निर्गमित झाला आहे. तर मेहकर तालुयातील मादणी ते पिंपरपाधी रस्ता, मादणी ते लेहणी रस्ता , मादणी टि पांईट ते मौंढाळा रस्ता, मादणी ते वडजी रस्ता, डोणगांव ते नागापूर रस्ता, नांदूरा तालुयातील खंडाळा फाटा ते खडदगांव रस्ता, पिंपळखुटा धांडे ते लोणवाडी रस्ता, तरवाडी ते मेंढळी रस्ता, अशा एकूण जिल्हयातील ३३ ग्रामीण रस्त्यांना दर्जान्नत करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाठपुरावा केल्यामुळे जिल्हयात ९५.०० कि.मी.च्या नवनिर्मित रस्त्यांना दर्जान्नती रस्त्यांना मान्यता मिळाली आहे.