अंकिता होले भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
तळेगाव (श्या.पंत)
bjp-ashti-taluka भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात जिपच्या माजी सदस्य अंकिता होले यांची भारतीय जनता पार्टी आष्टी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना नियुतीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अंकिता होले यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना या नव्या जबाबदारीसाठी आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ankita 
 
अंकिता होेले यांचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून असलेला जनसंपर्क आणि संघटनात्मक कार्याचा अनुभव यामुळे आष्टी तालुयात भाजपचे संघटन अधिक व्यापक, अभेद्य व गतिमान होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी व्यत केला. पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व आष्टी तालुयात पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी अंकिता होले काम करतील असे गाते म्हणाले. यावेळी जिल्हा महामंत्री कमलाकर निंभोरकर, जिल्हा महामंत्री अशोक कलोडे, आष्टी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष सचिन होले, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री प्रशांत काकपुरे, देवानंदजी डोळस आदी उपस्थित होते.