यवतमाळ
आत्महत्येपूर्वी रमाकांत शुक्ला यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत वनविभागातील कामकाजासह काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात ठेवला होता. घटनेची माहिती होताच शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली.
नातेवाईकांकडून उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना निवेदन देण्यात आले. शिवाय आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही वनअधिकारी, आरएफओ तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.आत्महत्येपूर्वीच्या या चिठ्ठीत करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर मृतदेह नेला