प्रभाग २८ मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Dighori Ward No. 28 दक्षिण नागपुरातील रमणा मारोती-दिघोरी प्रभाग क्रमांक २८ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार मोहन मते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर नीता ठाकरे, नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके उपस्थित होते.
 
 
 
anshu
 
 
धन्वंतरी नगर, रामकृष्ण नगर व सेनापती नगर येथे सिमेंट रस्त्यांचे बांधकाम तसेच सर्वश्री नगर येथील मंदिरात शेड उभारणीच्या कामाचा यामध्ये समावेश आहे. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अमर टिचकुले, मंडळ अध्यक्ष किरण दातीर, विजय आसोले, महेंद्र फरकाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र