वाशीम जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील ‘फायर ऑडिट’ चा प्रश्न ऐरणीवर

अमरावती येथील घटनेनंतर प्रशासन सतर्क

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
वाशीम,
private hospitals in washim district अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या शिशुंच्या अतिदक्षता कक्षाला व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तर सहा बालके गंभीर जखमी झाले. अशा प्रकारची दुदैवी घटना भंडारा जिल्हा रुग्णालयात घडली होती. त्यात दहा बालकांचा वेदनादायी मृत्यू झाला होता. अमरावती येथील घटनेनंतर वाशीम जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालयाच्या ‘फायर ऑडिट’ चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’ नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत प्रशानाने ठोस पावले उचलून अशा रुग्णालयावर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.
 
 
washim
 
वाशीम जिल्ह्यात जवळपास २५० च्या वर नोंदणीकृत खासगी रुग्णालये आहेत. सर्वच रुग्णालयात गंभीर आजारी रुग्णावर उपचार करण्यासाठी अद्ययावत विद्युत उपकरणे आहेत. बहुतांश उपकरणे २४ तास वापरात असतात. सलग वापरामुळे त्या उपकरणावर ताण येतो आणि ते गरम होतात. त्यामुळे त्यातील वायरींग जळण्याची भिती अधिक असते. तज्ञ डॉटरांच्या रुग्णालयात दरदिवशी शेकडो रुग्ण तपासणी साठी येतात. त्यात काही गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी भरती करुन केल्या जाते. गंभीर रुग्णावर गरजेनुसार विद्युत उपकरणावर उपचार करण्यात येतात. गंभीर आजारी रुग्णावर उपचार करणारी विद्युत उपकरणे एकदा रुग्णालयात आणून बसविल्यानंतर त्या उपकरणाची नियमीत तपासणी होते? हा एक संशोधनाचा विषय आहे. बहुतांश खासगी रुग्णालयातील अग्नीशमन यंत्रणेसह तेथील सुरक्षा यंत्रणा देखील कमकुवत आहे. बहुतांश रुग्ण हे कंपाऊंडरच्या भरोशावर आहेत. दरदिवशी एका रुग्णालयात किती रुग्णांची ओपीडी असावी व त्यांच्याकडून किती शुल्क घ्यावे यावरही कुठेही नियंत्रण नाही. दरदिवशी नामांकीत दरदिवशी रुग्णालयात २०० रुग्णांची नोंद होते. भरती केलेल्या रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता नाही. काही रुग्णालयात तर एवढी बिकट अवस्था आहे की, खाटा नसल्यामुळे रुग्णावर जमीनीवर उपचार केल्या जातात. सर्वच रुग्णालयात तज्ञ डॉटर वगळता अप्रशिक्षीत लोकांकडून रुग्णावर उपचार होत असल्याचे चित्र आहे.
 
 
अमरावती व भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुदैवी घटनेने रुग्णांच्या जिवीत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाशीम जिल्ह्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयाचा विचार केल्यास बहुतांश रुग्णालयाचा दरवर्षी ‘फायर ऑडिट’ चा प्रश्न अधांतरी आहे. भंडारा येथील घटनेनंतर राज्य शासनाने कठोर पावले उचलली असली तरी पुन्हा अमरावती येथे तीच घटना घडल्याने स्थानिक प्रशासन आपल्या कर्तव्याप्रती किती जागृत आहे हे दिसून येते. वाशीम जिल्हा प्रशासनाने अमरावती येथील घटनेतून धडा घेऊन तातडीने कठोर पावले उचलून ज्या खासगी रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’ झाले नसेल त्यांचेवर योग्य ती कारवाई करावी. तेव्हाच कुठे हे रुग्णालय संचालक दरवर्षी रुग्णांसाठी असलेल्या आवश्यक सुविधाकडे काळजीपूर्वक लक्ष देतीत आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.