नागपूर,
Late Pt. Rajabhau Kogje भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार स्व. पं. राजाभाऊ कोगजे यांच्या शताब्दीपूर्तीनिमित्त चिटणवीस सेंटर, सप्तक आणि मैफिल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व २७ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारोह चिटणवीस सेंटर येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
२६ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. साधना शिलेदार यांच्या सत्काराने होईल. त्यांना ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्कार-२०२६’ मिळाल्याबद्दल गौरविण्यात येणार आहे. यानंतर पं. राजेंद्र भावे यांचे व्हायोलिन वादन तसेच बनारस घराण्याचे गायक राहुल व रोहित मिश्रा यांचे शास्त्रीय गायन होईल.२७ ऑगस्ट रोजी प्रो. सुजाता व्यास व पं. अनिरुद्ध देशपांडे यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यानंतर स्व. पं. राजाभाऊ कोगजे यांच्या प्रत्यक्ष मैफिलीचे पुनर्प्रसारण करण्यात येणार आहे. तबला साथ वेद ढोक व निलेश खोडे, तर हार्मोनियम साथ संदीप गुरमुले व श्रीकांत पिसे करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:योगिता चकोले,संपर्क मित्र