पानिपतच्या रणभूमीवर झळकणार मराठ्यांची कीर्ती

हरियाणात उभारणार भव्य शौर्य स्मारक

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
तभा वृृत्तसेवा
मुंबई, 
Marathas on the battlefield of Panipat पानिपतच्या तिसऱ्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या मराठा वीरांच्या पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हरियाणातील 'काला आंब' येथे भव्य ‘पानिपत युद्ध स्मारक’ उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, स्मारकासाठी जागा निश्चित झाली असून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
 
 
 
Marathas on the battlefield of Panipat
 
मराठी भाषेवरून राजकारण करू नका
दरम्यान, मुंबईतील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी बोलण्याच्या नियमावरून उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या राजकारणाचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. “महाराष्ट्रात व्यवसाय करताना स्थानिक जनतेशी बोलण्यापुरती प्राथमिक मराठी शिकणे आवश्यक आहे. कोणाचाही परवाना रद्द केलेला नाही, उलट शिकण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे. भाषेच्या नावावर कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.