पुणे
mirzapur the movie पुणेकरांनो, सज्ज व्हा! बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम येत्या बुधवारी पुणे शहरात दाखल होणार आहे. ओटीटीवरील लोकप्रिय ‘मिर्झापूर’ विश्व पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दमदार कथा, लक्षवेधी व्यक्तिरेखा, थरारक घडामोडी आणि गाजलेले संवाद यांमुळे ‘मिर्झापूर’ने ओटीटी विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता याच लोकप्रिय विश्वाचा विस्तार ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या माध्यमातून अधिक भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर होणार आहे. पुण्यातील प्रमोशनल भेटीदरम्यान चित्रपटाची टीम चाहत्यांशी संवाद साधणार असून, या भेटीमुळे प्रदर्शनाआधीच चित्रपटाची चर्चा आणखी रंगण्याची शक्यता आहे.
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी पुण्यातील ही भेट विशेष ठरणार आहे. शहरात चित्रपटाची टीम येणार असल्याने चाहत्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मोठ्या पडद्यावर ‘मिर्झापूर’चे जग कशा स्वरूपात अनुभवायला मिळणार, याबाबत सध्या मनोरंजनप्रेमींमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रमोशनल दौऱ्याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
ॲमेझॉन MGM स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे. चित्रपटाची कथा आणि लेखन पुनीत कृष्णा यांचे आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सह-निर्माते आहेत.
पुण्यातील या खास प्रमोशनल भेटीनंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचण्याची अपेक्षा आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ येत्या ४ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.