अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ची बुसानमध्ये आंतरराष्ट्रीय झेप

31व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार वर्ल्ड प्रीमियर

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
मुंबई
national award winning actress तमिळ लेखक-दिग्दर्शक सैलेश रत्नकुमार यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा फीचर फिल्म ‘सेल्वी’ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘न्यूटन’ आणि ‘कालाम’मधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी तसेच नॅशनल फिल्म अवॉर्ड विजेती अभिनेत्री अंजली पाटील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, तिनेच या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. 31व्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या व्हिजन एशिया विभागात ‘सेल्वी’चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. हा प्रतिष्ठित महोत्सव 6 ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान पार पडणार आहे.
 

national award winning actress 
होम-केअर वर्कर्सच्या मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिलेल्या जगाची गोष्ट ‘सेल्वी’मध्ये मांडण्यात आली आहे. काळजी, स्थलांतर, मैत्री, अपराधीपणा, थकवा आणि कितीही संकटे आली तरी पुढे जात राहण्याची जिद्द या भावनांभोवती चित्रपटाची कथा फिरते. या जगातील सामान्य माणसांच्या आयुष्याकडे अत्यंत जवळून पाहण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.
या चित्रपटाची कथा सैलेश रत्नकुमार यांनी सिनेमॅटोग्राफर भार्गव श्रीधर यांच्यासोबत लिहिली आहे. भार्गव यांच्या आईच्या गंभीर आजारपणादरम्यान अनेक महिने त्यांची काळजी घेणाऱ्या होम-केअर नर्सेसना जवळून पाहिल्यानंतर या कथेची संकल्पना आकाराला आली. तमिळनाडूतील छोट्या शहरांतून आलेल्या या स्थलांतरित महिला साध्या हॉस्टेलमध्ये राहतात आणि दररोज अशा घरांमध्ये काम करतात, जी त्यांच्या स्वतःच्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. स्वतः कोयंबतूरहून चेन्नईला स्थलांतरित झालेल्या सैलेश यांना या जगातील ताणतणाव आणि वास्तव जवळून जाणवले.
चित्रपटाच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना सैलेश म्हणतो, “‘सेल्वी’ ही एका महिलेच्या आयुष्यातील अगदी साध्या दिवसाची गोष्ट आहे. मला हा चित्रपट तिच्यासोबत चालावा असं वाटलं. तिच्या आयुष्याच्या अगदी जवळ राहावं, पण तिचं आयुष्य समजावून सांगण्याचा किंवा त्याला आहे त्यापेक्षा जास्त अर्थ देण्याचा प्रयत्न करू नये.”
नव्या आशियाई दिग्दर्शकांसाठी बुसान फिल्म फेस्टिव्हलमधील व्हिजन एशिया हा विशेष व्यासपीठ मानला जातो. जागतिक सिनेमातील नव्या प्रतिभांचा शोध घेण्यासाठी या विभागाकडे विशेष लक्ष दिले जाते. अशा प्रतिष्ठित विभागात ‘सेल्वी’चा वर्ल्ड प्रीमियर होणे हा चित्रपटासाठी महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय टप्पा ठरला आहे.
मुख्य अभिनेत्री आणि निर्माती अंजली पाटील हिने आपल्या अनाहत फिल्म्स या बॅनरखाली ‘सेल्वी’ची निर्मिती केली आहे. 2021 मध्ये स्थापन झालेली अनाहत फिल्म्स भारतीय तसेच जागतिक प्रेक्षकांसाठी अर्थपूर्ण, दमदार आणि वैविध्यपूर्ण कथा सादर करण्यासाठी ओळखली जाते. फिक्शन आणि नॉन-फिक्शन अशा दोन्ही स्वरूपांमध्ये या बॅनरने विविध प्रकल्पांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये सनडान्स 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द मूगाई’ आणि बर्लिनाले 2025 मध्ये स्थान मिळवलेल्या ‘बक्शो बॉन्डी’चा समावेश आहे. ‘सेल्वी’ हा अनाहत फिल्म्सचा पहिला फुल-लेंथ तमिळ फीचर फिल्म आहे.
अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ‘सेल्वी’चा अनुभव national award winning actress  आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगताना अंजली म्हणते, “एक अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ‘सेल्वी’ माझ्यासाठी अशा कथांमधून क्रिएटिव्ह इंडिपेंडन्स पुन्हा मिळवण्याचा मार्ग ठरला, ज्या सांगण्यासाठी संयमाची गरज असते. हेल्थकेअर क्षेत्रातील त्या सामान्य लोकांकडे पाहण्याचा हा एक अतिशय वैयक्तिक आणि जवळचा दृष्टिकोन आहे, जे आयुष्यभर इतरांची काळजी घेत राहतात, पण त्याच वेळी त्यांचं स्वतःचं आयुष्य शांतपणे कोमेजत जातं. बुसानमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होणं हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा मोठा टप्पा आहे. ‘सेल्वी’ला आम्ही पुन्हा तिच्या घरी, त्या लोकांकडे घेऊन जाणार आहोत, ज्यांची ही कथा खरं तर आहे.”
‘सेल्वी’ला अनुभवी आणि पुरस्कारविजेत्या तंत्रज्ञांची साथ लाभली आहे. चित्रपटाचे एडिटिंग नऊ नॅशनल फिल्म अवॉर्ड पटकावणारे ए. श्रीकर प्रसाद यांनी केले आहे. तर ‘पोन्नियिन सेल्वन: पार्ट वन’साठी नॅशनल अवॉर्ड मिळवणारे आनंद कृष्णमूर्ती यांनी चित्रपटाचे साऊंड डिझाईन केले आहे.
चित्रपटाच्या निर्मितीत रेड सी फंडची को-प्रोड्यूसर म्हणून साथ मिळाली आहे. रेड सी फंड हा रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा एक उपक्रम आहे. याशिवाय ‘सेल्वी’ला हॉन्ग कॉन्ग एशिया फिल्म फायनान्सिंगकडूनही पाठबळ मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर होणाऱ्या या वर्ल्ड प्रीमियरमुळे ‘सेल्वी’कडे आता भारतीय तसेच जागतिक चित्रपटविश्वाचे लक्ष वेधले गेले आहे.