औषध व्यापाऱ्याची २१.८५ लाखांनी फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या नावावर लुटले

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर

pharmacist loses फेसबुकवरील जाहीरातीला फसून एका औषध विक्रेत्याला शेअर ट्रेडिंगमध्ये दुप्पट नफा मिळविण्याच्या नादात २१ लाख ८५ हजार रुपये गुंतवले. सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्यानंतर गुंतवणूकदार औषध विक्रेत्याला ब्लॉक केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
 

pharmacist loses rs 21.85 lakh in share trading scam in nagpur 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदानमधील अयप्पानगरात राहणारे मोहसीन रझा काझी रहमुद्दीन काझी यांचे औषधशास्त्र विषयात शिक्षण झाले आहे. ते मोठ्या प्रमाणात औषधी खरेदी करुन लहान मेडिकल स्टोअर्सला किरकोळ स्वरुपात औषधी विक्री करतात. आतापर्यंत लाखो रुपये कमविल्यानंतर काझी यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करुन कोट्यवधी रुपये कमविण्याचे ठरविले होते. त्यांनी फेसबुकवर शेअर ट्रेडिंगची जाहिरात बघितली. त्यांनी त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. आरोपी सायबर गुन्हेगारांनी काझी यांना जाळ्यात ओढत एका व्हॉट्सअप ग्रूपमध्ये जोडले. त्यामध्ये १ लाखांवर एका दिवसांत लाभ होत असल्याचे स्क्रीनशॉट शेअर होत असल्याचे दिसले. काझी यांनीही झटपट कोट्यधीश बनण्याच्या आमिषाने सुरुवातीला एक लाख गुंतवले. काही तासांतच एका लाखांचे २ लाख झाले. ते पैसे त्यांच्या वॉलेट असलेल्या खात्यात दिसायला लागले. त्यामुळे त्यांनी आणखी पैसै गुंतवायला सुरुवात केली. त्यांनी २१ लाख ८५ हजार रुपये गुंतविल्यानंतर खात्यात जवळपास ८५ लाख दिसायला लागले. त्यामुळे काझी यांनी ५० लाख रुपये काढण्याचा विचार केला. मात्र, पैसे काढण्यासाठी विचारणा केली असता सायबर गुन्हेगाराने आणखी २१ लाख रुपये भरण्यास सांगितले. काझी यांनी पैसे भर‌ण्यास नकार दिल्यानंतर त्यांना ब्लॉक करण्यात आले. त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर गुन्हे शाखेत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.