rain-remains nagpur पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू असून, ऑगस्ट महिना संपत आला असतानाही विदर्भात अपेक्षित पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्याचा थेट परिणाम जलसाठ्यांवर झाला असून, नागपूर विभागातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे. अपेक्षित पाऊस न झाल्यास जलसाठे कसे भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थिती आणखी लक्षवेधी आहे. विभागातील ४३ मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या ५६.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, गतवर्षी याच दिवशी हा साठा ७६.८८ टक्के होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत २०.०४ टक्क्यांची घट झाली आहे.
नागपूर विभागातील गोसेखुर्द प्रकल्पात सध्या ६७.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ४४.६८ टक्के होता. मात्र इतर प्रकल्पांमध्ये परिस्थिती तुलनेने कमी समाधानकारक आहे. तोतलाडोहमध्ये ६०.२२ टक्के, वडगाव : ५३.३१ टक्के, नांद : ५२.०१ टक्के, तर खिंडसीमध्ये ६२.३० टक्के पाणीसाठा आहे.