राष्ट्रसंत विचारधारेच्या एम.ए.ला मान्यता द्या

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत विचारधारेवरील एम.ए. अभ्यासक्रमाला तातडीने यूजीसी मान्यता मिळावी, अशी मागणी राष्ट्रसंतप्रेमींनी केली. मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

dod 
 
या मागणीसाठी शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांची भेट घेतली. यूजीसी मान्यतेसाठी विद्यापीठाने केलेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे मागितली असता ती तत्काळ उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाने केलेल्या कार्यवाहीचा खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली. प्रश्न तातडीने न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
सौजन्य :ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र