पोरवाल कॉलेजच्या संघाचे राज्य अजिंक्यपद

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
नागपूर,(कामठी)
S. K. Porwal Junior College, महा इंडोअर क्रिकेट असोसिएशन तर्फे जळगाव येथे झालेल्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कामठी येथील एस. के. पोरवाल ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नागपूर संघाचे प्रतिनिधित्व करत राज्य अजिंक्यपद पटकावले.अंतिम सामन्यात नागपूर संघाने ११० धावांचे लक्ष्य ठेवत जळगाव संघाचा पराभव केला.
 
 
 
kamthi
 
 
विजयी संघात विष्णू दिवाकर, डॅनी हटवार, वेदांत विकास, शमशेर सर्वज्ञ, संतोष खुर्गे व ईशांत गमधुले यांचा समावेश होता.दरम्यान, कॉलेजच्या धारणा कादियान, साक्षी सहारे व निहारिका शंभरकर या तीन विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावरील इंडोअर क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. प्रा. डॉ. मल्लिका नागपुरे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. स्वप्नील दहाट यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
सौजन्य :प्रा डॉ सुधीर अग्रवाल ,संपर्क मित्र