जलसंवर्धनासाठी डॉ. डबली यांचा सन्मान

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
Senior Journalist Dr. Praveen Dubli ज्येष्ठ पत्रकार, जलसंवर्धन कार्यकर्ते डॉ. प्रवीण डबली यांना ऐतिहासिक विहिरी व पारंपरिक जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या कार्याबद्दल ‘महासागर महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
 
pravin
 
 
‘महासागर जलसमृद्ध विदर्भ २०३५’ कार्यक्रमात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. ओमप्रकाश शेटे आणि श्रीकृष्ण चांडक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूरमधील पारंपरिक जलस्रोतांच्या संवर्धनासाठी डॉ. डबली गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. विशेषतः ऐतिहासिक मोतीबाग विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली.या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. डबली यांचे अभिनंदन केले
सौजन्य:सुहास खरे,संपर्क मित्र