ग्राम रोजगार सेवकाला पंचायत समिती कार्यालयात मारहाण

दोघावर गुन्हा दाखल

    दिनांक :25-Aug-2026
Total Views |
मानोरा,
panchayat samiti office पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या गादेगाव येथील ग्रामरजगार सेवक ग्रामसभा झाल्याचे ठरावाचे अहवाल ग्रामपंचायत कर्मचारी सोबत २४ ऑगस्ट रोजी पंचायत समिती मानोरा या शासकीय कार्यालयात देण्यासाठी आले होते. आणि ते कागदपत्र जोडत असताना गादेगाव येथील आरोपी सुदाम भिका जाधव आणि आरोपी मुलगी पुष्पा महादेव चव्हाण हे दोघे आले असता त्यांनी रोजगार सेवकाला चपलीने डोयावर पाठीवर मारहाण केली आणि जाती वर अश्लिल भाषेत शिवागाल केली.
 
 
panchayat samiti office
 
पंचायत समिती मध्ये घटना घडल्यावेळी बेरेचसे नागरिक आणि कर्मचारी यांनी पहिले आहे. सदर घटना घडल्यानंतर फिर्यादी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊनमारहाण वेळी हजर असलेले काही नागरिक आणि कर्मचारी यांचे पुरावे नुसार रिपोर्ट दाखल केले आहे . सदर घटना नुसार मानोरा पोलिस स्टेशन ठाणेदार यांनी आरोपी सुदाम भिका जाधव आणि आरोपी मुलगी पुष्पा महादेव चव्हाण यांच्यावर बी. एन. एस २०२३नुसार ११५ (२), ३५१ (१), २९६, ३ (५) आणि अनुसचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार कलम ३ (१) आर, ३ (१) यस, ३ (२) व्ही अ नुसार गुन्हा दाखल झाले आहे.पुढील उपविभागीय पोलीस अधिकारी तपास हे करीत आहे.